Ad will apear here
Next
सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी कांबळे
पुणे : दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन ह्युमन राईट कौन्सिलच्या सामाजिक न्याय विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी पुण्यातील शशिकांत कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हाती घेतलेले काम तडीस जाईपर्यंत पाठपुरावा करण्याचे त्यांचे कौशल्य लक्षात घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार नियंत्रण यासह बनावट चलन, मानवी तस्करी, बाल कामगारी रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. एखाद्या प्रकरणाचा शोध घेऊन त्याबाबतची माहिती कौन्सिलला पुरविण्याचीही जबाबदारी असणार आहे.

या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना कांबळे म्हणाले, ‘या निवडीमुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे. बालहक्क, कामगार हक्क, महिला हक्क, शैक्षणिक हक्क, मूलभूत हक्क, अपंगत्व अधिकार, ग्राहकांचे हक्क जेष्ठ नागरिकांचे हक्क, माहितीचा अधिकार याचे महत्त्व अबाधीत राखण्यासाठी माझा प्रयत्न राहील.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZNWBO
Similar Posts
आंबेडकर संघर्ष समितीतर्फे संविधानाच्या प्रतींचे वाटप पुणे : भारतीय संविधान दिनानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. भारतीय संविधान जनमानसात पोहोचावे, यासाठी दर वर्षी संविधान दिनाच्या निमित्ताने समितीचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासन क्षेत्रातील मान्यवरांना, तसेच
‘बाबासाहेबांचे विचार आचरणात आणावेत’ पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्यातील कायदेतज्ज्ञ, पत्रकार, तत्त्वज्ञ, राजकारणी समजून घेऊन त्यांचे विचार आपण आचरणात आणायला हवेत. आजच्या तरुणांनी बाबासाहेबांना अभिप्रेत कार्य उभारण्यासाठी शिक्षणाकडे गांभीर्याने पाहायला हवे. तरुणांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी हा पुस्तक
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language